Pune : वाहन चोरी प्रकरणी 5 अल्पवयीन मुलांना ताब्यात

एमपीसी न्यूज – उत्तमनगर येथे एक अल्पवयीन मुलगा पेट्रोलिंग दरम्यान अचानक एक दुचाकी घेऊन जात असताना गाडीचा नंबर संशयास्पद वाटल्याने त्यास पोलिसांनी थांबवून चौकशी केली असता ती गाडी चोरीची असल्याचे स्पष्ट झाले. ही घटना 31 जुलै 2018 ला घडली.

उत्तमनगर येथे पेट्रोलिंग दरम्यान एक अल्पवयीन मुलगा दुचाकी घेऊन अचानक जात असताना पोलिसांना त्याच्यावर संशय आला. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता सदर दुचाकी(अॅक्टिव्हा) ही 3 महिन्यांपूर्वी शिवणे येथून त्याने मित्रांच्या मदतीने चोरल्याचे समजले. पोलिसांनी अधिक तपास केला असता आणखी त्याचे चार अल्पवयीन साथीदार असून त्या सर्वांनी मिळून वारजे, उत्तमनगर परिसरामध्ये वाहनांची चोरी केल्याचे कबूल केले. पोलिसांनी तपास करून एकूण 5 अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले व त्यांच्याकडून एकूण 1,15,000 रुपये किमतीची 7 दुचाकी वाहने ताब्यात घेतली.

ही अल्पवयीन मुले मौजमजेसाठी एकमेकांच्या मदतीने वाहने चोरी करून गाड्यांच्या मूळ क्रमांकामध्ये फेरफार करून वापरत असत. तरी या अल्पवयीन बालकांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले गेले असून गाड्यांच्या मालकांचा शोध अद्याप चालू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.