Dehuroad : कोयत्याचा धाक दाखवून कामगारांचे पाच मोबाईल फोन पळवले

एमपीसी न्यूज – कोयत्याचा धाक दाखवून तीन जणांनी मिळून पाच मोबाईल फोन चोरून नेले. ही घटना बुधवारी (दि. 26) रात्री अकराच्या सुमारास किवळे मधील व्ही एम जावळे कन्स्ट्रक्शन साइटवर घडली.

सिद्धेश्वर शंकराप्पा ताडगे (वय 24, रा. किवळे. मूळ रा. लातूर) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार तीन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किवळे येथे व्ही एम जावळे कन्स्ट्रक्शन कंपनीची एक बांधकाम साईट सुरू आहे. त्या बांधकाम साइटवर सिद्धेश्वर काम करतात. बुधवारी रात्री तीन अज्ञात इसम बांधकाम साइटवर आले. त्यांनी कोयत्याचा धाक दाखवून सिद्धेश्वर आणि त्यांच्या इतर पाच सहकारी कामगारांचे 30 हजार 400 रुपये किमतीचे 5 मोबाईल फोन  चोरून नेले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.