Pimpri News : 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी आणखी पाच लसीकरण केंद्र

0

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेने 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी केंद्रात वाढ केली आहे. यापूर्वी केवळ तीन केंद्रावर या वयोगटातील नागरिकांना लस दिली जात होती. आता त्यामध्ये पाच केंद्राची वाढ करण्यात आली आहे. आठ ठिकाणी लसीकरण होणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

1 मे पासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाले आहे. या नागरिकांसाठी महापालिकेने नवीन भोसरी, नवीन जिजामाता रुग्णालय आणि प्रेमलोक पार्क  दवाखान्यात लसीकरण सुरू केले होते. याठिकाणी नोंदणी झालेल्या 600 नागरिकांपैकी 586 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. आजही 600 नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे.

महापालिकेने 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी केंद्रात वाढ केली आहे. यमुनानगर रूग्णालय निगडी,  नेत्र रुग्णालय  मासूळकर कॉलनी, पिंपळेनिलख येथील महापालिका शाळा, नवीन आकुर्डी रुग्णालय, अहिल्यादेवी होळकर शाळा असे पाच केंद्र वाढविण्यात आले आहेत. या ठिकाणी दुपारी बारा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत लसीकरण करण्यात येणार आहे. नोंदणी केलेल्यांनीच लसीकरणासाठी यावे असे आवाहन महापालिकेने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment