Pune : मानाच्या पाचही गणपतींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

एमपीसी न्यूज – मानाच्या पाचही गणपतींचे बाप्पा मोरया मोरयाच्या जय घोषात भक्तीमय वातावरणात सायंकाळी विसर्जन करण्यात आले.

टिळक पुतळा येथून आज सकाळी साडेदहा वाजता मिरवणुकीस प्रारंभ झाल्यानंतर तब्बल साडेपाच तासांनी मानाच्या पहिल्या गणपतीचे विसर्जन करीत लाडक्या बाप्पांना गणेशभक्तांनी भावपूर्ण निरोप दिला. यावेळी मोरया मोरया, बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करण्यात आला.

कसबा गणपती पाठोपाठ मानाचा दुसरा गणपती श्री तांबडी जोगेश्वरीचे सायंकाळी सव्वापाच तर मानाच्या तिस-या गुरुजी तालीम गणपतीचे सायंकाळी साडेपाच वाजता विसर्जन नटेश्वर घाटातील कृत्रिम हौदात करण्यात आले.

तर मानाच्या चौथ्या तुळशीबाग गणपतीचे पांचाळेश्वर घाटावर सायंकाळी साडेसहा वाजता विसर्जन झाले. त्यानंतर मानाचा पाचवा श्री केसरीवाडा गणपतीचे विसर्जन करण्यात आले. यावेळी गणपती बाप्पांना निरोप देताना गणपती गेले गावाला चैन पडेना जीवाला, एक दोन तीन चार गणपतीचा जयजयकार असा जयघोष करण्यात आला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.