Pune : लिफ्टमधे अडकलेल्या गरोदर महिलेसह 5 जणांची अग्निशमन दलाच्या जवानांकडून सुटका

एमपीसी न्यूज – घटनास्थळी लिफ्टमधे तांत्रिक बिघाड झाल्याने बंद पडलेल्या लिफ्टमधे अडकलेल्या गरोदर महिलेसह 5 जणांची अग्निशमन दलाच्या जवांनाकडून सुटका करण्यात आली.

काल सोमवारी (दि.15) मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ससून रुग्णालयाच्या लिफ्टमधे सहाजण अडकले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, लिफ्टमधे लोक अडकल्याची माहिती अग्निशमन नियंत्रण कक्षाला मिळताच अग्निशमन दलाने नायडू अग्निशमन केंद्र व मुख्यालय येथून दोन वाहने तातडीने ससूनला रवाना केली. काही मिनिटातच अग्निशमन दलाचे जवान ससून रुग्णालयात पोहोचले. लिफ्टमधे प्रसुतीकरिता शासकीय रुग्णवाहिकेतून आलेली महिला तसेच डॉक्टर व इतर चार, असे एकूण सहाजण अडकल्याचे जवानांनी पाहिले. महिलेची अवस्था पाहून जवानांनी केंद्रप्रमुख विजय भिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली बचाव काम सुरु केले. घटनास्थळी लिफ्टमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने लिफ्ट बंद पडली होती.

शासकीय रुग्णवाहिकेतून प्रसुतीकरिता एका महिलेला उपचाराकरिता आणले होते. ती महिला व स्वत: रुग्णवाहिकेतील डॉक्टर व इतर चार या लिफ्टमधे तळमजला व पहिल्या मजल्याच्या मधोमध अडकून पडले. जवानांनी लिफ्टच्या डक्टमधे प्रवेश करुन व इतर जवानांनी लिफ्टच्या बाहेर खूर्ची ठेवून कौशल्याने तीस मिनिटातच गरोदर महिलेला अक्षरश: खांद्यावरुन बाहेर घेत  इतर ही लोकांची
सुखरुप सुटका केली.

या बचाव कामगिरीमधे नायडू अग्निशमन केंद्राचे अधिकारी विजय भिलारे, तांडेल तानाजी मांजरे, चालक करिम पठाण, ज्ञानेश्वर भाटे व जवान जयेश गाताडे, विजय पिंजण, विष्णू जाधव, रवि जाधव, विनायक माळी, अक्षय दीक्षित यांनी सहभाग घेत एका गरोदर महिलेला व तिच्या पोटी जन्म घेणाऱ्या बाळाला मोठे जीवदानच दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.