Bhosari Crime News : विवाहित महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह पाच जणांवर गुन्हा 

एमपीसी न्यूज – विवाहित महिलेचा वारंवार मानसिक आणि शारीरिक छळ करुन तिला आत्महत्येस प्रवृत्त केले. याप्रकरणी पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 21 जून ते 17 डिसेंबर 2020 दरम्यान भोसरीतील भगतवस्ती येथे घडला. 

याप्रकरणी विवाहित महिलेचा पती विशाल विठ्ठल घंदुरे (वय 35), सासु शोभा विठ्ठल घंदुरे (वय 55), सासरे विठ्ठल घंदुरे (वय 55), स्नेहल विठ्ठल घंदुरे (वय 29) आणि दिर विजय विठ्ठल घंदुरे (वय 31) (सर्व रा. भगतवस्ती, भोसरी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत महिलेच्या वडिलांनी याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत महिलेच्या लग्नाच्या दुस-या दिवसापासुनच आरोपींनी ‘तुला जेवण बनवता येत नाही, भांडी धुता येत नाही, तुला तुझ्या आई बापांनी शिकवले नाही, जा जावुन जीव दे’ असे म्हणुन वांरवार शिवीगाळ करून, मानसिक छळ केला. तसेच, हि महिला गरोदर असताना देखील सासु व नंणद यांनी रागाने तिला जमिनीवर ढकलून दिले, आणि पोटावर लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. मयत महिलेला उपाशी ठेवले, लग्नात दिलेले दागीने घालण्यास दिले नाहीत.

विवाहित महिलेचा मानसिक व शारीरिक छळ करुन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक तलावडे अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.