Pimpri Chinchwad Tree Falling : पिंपरी चिंचवडमध्ये पाच ठिकाणी पडले झाड

एमपीसी न्यूज : पिंपरी चिंचवड परिसरात आज संध्याकाळी झालेल्या तुफान पावसामुळे पाच ठिकाणी झाड पडल्याच्या (Pimpri Chinchwad Tree Falling) घटना घडल्या. अशी माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या पिंपरी मुख्यालयाने दिली. या पाचही घटनांमध्ये कोणत्याही माणसाला दुखापत झाली नाही. अचानक पडलेल्या पावसामुळे बाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली.

संध्याकाळी 5 नंतर एक मोठे झाड डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक जवळील स्टेशन रोडवर, हॉटेल रत्ना जवळ पडले होते. झाड मोठे असल्याने वाहतूक कोंडी झाली होती. एक अग्निशमन बंब घटनास्थळी पाठविण्यात आला होता. अग्निशमन कर्मचाऱ्यांनी झाड कापून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. संध्याकाळी साडेपाच वाजता चिंचवड स्टेशन भागात द्वारकादास जवळ एक झाड पडले होते. एक अग्निशमन बंब घटनास्थळी पाठविण्यात आला होता. अग्निशमन कर्मचाऱ्यांनी झाड कापून रस्ता खुला करण्यात आला होता.

Wakad News: भूमकर चौक, वाकड परिसरातील वाहतूक कोंडीवर प्राधान्याने उपाययोजना करा; विभागीय आयुक्तांचे निर्देश

संध्याकाळी पिंपरी येथे एसएनबीपी शाळेजवळ रस्त्यावरती एक झाड पडले होते. एक अग्निशमन बंब घटनास्थळी पाठविण्यात आला होता. अग्निशमन कर्मचाऱ्यांनी झाड कापून रस्ता करण्यात आला होता. संध्याकाळी पिंपरी येथील सेंट्रल मॉलच्या मागे असलेल्या श्रद्धा रेसिडेन्सी जवळील रोडवर दोन ते तीन ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या होत्या. एक अग्निशमन बंब घटनास्थळी पाठविण्यात आला होता. अग्निशमन कर्मचाऱ्यांनी त्या फ़ांद्या हटवल्या.

संध्याकाळी नवी सांगवी येथील सीएमई सोसायटीमध्ये एक झाड पडले होते. एक अग्निशमन बंब घटनास्थळी पाठविण्यात आला होता. अग्निशमन कर्मचाऱ्यांनी झाड कापून रस्ता मोकळा करण्यात आला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.