Accident News : भोसरी, देहूरोड, वाकडमध्ये झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातांमध्ये पाचजण गंभीर जखमी

एमपीसी न्यूज – भोसरी आणि देहूरोड येथे झालेल्या अपघातात प्रत्येकी दोन तर वाकड मधील अपघातात एकजण गंभीर जखमी झाला. याबाबत सोमवारी (दि. 8) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

भोसरी येथील अपघातात मयूर शरद लोंढे (वय 29, रा. दिघी. मूळ रा. नाशिक), अशोक संपत सातव हे दोघेजण जखमी झाले आहेत. लोंढे यांच्या दुचाकीला सोमवारी (दि. 8) रात्री पावणे एक वाजता एका कारने धडक दिली. त्यात दोघेजण गंभीर जखमी झाले. कार चालक अपघाताच्या ठिकाणी न थांबता निघून गेला. लोंढे यांच्या दुचाकीचेही मोठे नुकसान झाले. लोंढे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

_MPC_DIR_MPU_II

देहूरोड येथील अपघातात निखिल बाजीराव पाटील (वय 27, रा. कर्वेनगर, पुणे) आणि वैभव हे दोघेजण जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी (दि. 7) सायंकाळी पुणे-बेंगलोर महामार्गावर देहूरोड जवळ घडली. पाटील यांनी याप्रकरणात फिर्याद दिली आहे. पाटील आणि त्यांचा मित्र दुचाकीवरून जात असताना एका वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याने अपघात झाला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

वाकड येथील अपघातात रेश्मा विजय पालांडे (वय 41, रा. थेरगाव) या जखमी झाल्या आहेत. पालांडे यांच्या फिर्यादीनुसार दुचाकी चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालांडे या सोमवारी सकाळी 16 नंबर बस स्टॉप येथे झेब्रा क्रॉसिंगवरून रस्ता ओलांडत होत्या. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या दुचाकीने त्यांना धडक दिली. त्यात पालांडे गंभीर जखमी झाला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.