Lonavala : पाच हजार दिव्यांनी उजळले पवना विद्या मंदिर

पवना शिक्षण संकुलात दिपोत्सोव उत्साहात

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील पवना शिक्षण संकुलातील पवना विद्या मंदिर शाळेत शाळेचे सुवर्ण महोत्सव वर्ष व त्रिपुरारी पौर्णिमेचे औचित्य साधत पाच हजार दिवे लावण्यात आले होते. दिव्यांच्या प्रकाशाने शाळेचा परिसर उजळून गेला होता.

नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे पवना विद्या मंदिर शाळेला यावर्षी पन्नास वर्ष पूर्ण होत असून शाळेच्या वतीने  दीपोत्सोवाचे आयोजन करण्यात आले होते.

या दीपोत्सवाचे उद्घाटन संस्थेचे सचिव व शालेय समिती अध्यक्ष संतोष खांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे संचालक सोनबा गोपाळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुनील भोंगाडे, माजी विद्यार्थी संघटना अध्यक्ष काशिनाथ निंबळे, सरंपच खंडू कालेकर, उपसरपंच प्रविण घरदाळे, सदस्य उत्तम चव्हाण, महागाव माजी पोलीस पाटील अनंता तिकोणे, सागर घाडगे, सुनील कालेकर, तानाजी काळे, पवनानगर परिसरातील सर्व पोलीस पाटील, प्राचार्य दशरथ ढमढेरे, कमल ढमढेरे, पांडूरंग पोटे पर्यवेक्षिका नीला केसकर व माजी विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी शालेय समिती अध्यक्ष संतोष खांडगे यांनी शाळेची वाटचाल व सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त होणारे विविध कार्यक्रम यांची माहिती जास्तीत जास्त माजी विद्यार्थ्यांनी व नागरिकांना देण्याचे आवाहन केले. दीपोत्सवानिमित्त पवना शिक्षण संकुलातील विद्यार्थी व विद्यार्थीनी यांनी आकर्षक रांगोळी व दिव्यांची सजावट केली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.