Pune : ब्रेकफेल झाल्यामुळे ट्रकची पाच गाड्यांना धडक ; 8 जण जखमी

धायरी वडगाव पुलाजवळील घटना

एमपीसी न्यूज- भरधाव वेगातील ट्रकचे ब्रेकफेल झाल्यामुळे ट्रकने पाच गाड्यांना धडक दिली. या घटनेमध्ये 8 जण जखमी झाले. ही घटना आज सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास धायरी वडगाव पुलाजवळ घडली. जखमींपैकी एका महिलेची आणि दोन पुरुषांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर नवले रूग्णालयात उपचार सुरु आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.