Pune News : सराईत वाहनचोर अटकेत,पाच दुचाकी जप्त

एमपीसी न्यूज : शहरातील विविध भागातून दुचाकींची चोरी करणाऱ्या सराईताला खडक पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून १ लाख ५ हजारांच्या पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. सुलतान रिझवान शेख रा. गांधीनगर येरवडा असे अटक केलेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडक पोलीस गस्त घालत असताना सराईत वाहनचोर भवानी पेठेत थांबला असल्याची माहिती पोलीस कर्मचारी अमेय रसाळ आणि राहुल मोरे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून सुलतानला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने खडक, लष्कर, कोंढवा, कोरेगाव पार्क परिसरातून ५ दुचाकी चोरल्याची कबुली दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.