Bike thief : निगडी, आळंदी, देहूरोड, चिखलीमधून पाच दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज – निगडी, आळंदी, देहूरोड आणि चिखली परिसरातून पाच दुचाकी (Bike thief) चोरीला गेल्या आहेत. या प्रकरणी सोमवारी (दि. 23 मे) अज्ञातांच्या विरोधात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

अक्षय दत्तात्रय आरेकर (वय 25, रा. निगडी) आणि हर्षद संदीप मोरे (वय 20, रा. यमुनानगर, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अक्षय आरेकर यांची 22 हजारांची स्प्लेंडर दुचाकी आणि हर्षद मोरे यांची 10 हजारांची बजाज प्लॅटीना दुचाकी चोरीला गेली आहे.

सिधू शंकर कुदळे (वय 45, रा. रहाटणी) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी कुदळे यांची 15 हजार रुपये किंमतीची दुचाकी गाडगे महाराज मंगल कार्यालयाच्या समोरील पार्किंगमधून चोरीला गेली आहे.

Chikhali News : कुदळवाडीत किराणा दुकान आणि दुकानदाराचे घर फोडले

सुनील राजेश्वर आगरवाल (वय 59, रा. देहूरोड) यांनी देहूरोड (Bike thief) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची 25 हजार रुपये किंमतीची दुचाकी विकासनगर येथील माऊली हॉस्पिटल समोरून चोरीला गेली आहे.

मोहम्मद अमीरअली सैद मोहम्मद सलमानी (वय 28, रा. कुदळवाडी, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची 20 हजार रुपये किंमतीची दुचाकी त्यांच्या घरासमोरून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.