Pimpri News : वर्धापनदिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात ध्वजारोहण

0

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 22व्या वर्धापनदिनानिमित्त पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पार्टीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्या हस्ते खराळवाडीतील पक्ष कार्यालयाच्या आवारात ध्वजारोहण करण्यात आले.

_MPC_DIR_MPU_II

माजी विरोधी पक्षनेते, नगरसेवक नाना काटे यांच्या हस्ते पार्टीच्या ध्वजाचे पुजन करण्यात आले. यावेळी आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे,  विरोधी पक्षनेते  राजू मिसाळ, माजी महापौर मंगला कदम, महिला शहराध्यक्षा, नगरसेविका वैशाली काळभोर,  नगरसेवक भाऊसाहेब भोईर, मयुर कलाटे, विक्रांत लांडे, जगदीश शेट्टी, अतुल शितोळे, राजेंद्र जगताप, फजल शेख, विजय लोखंडे, वर्षा जगताप, कविता खराडे, तसेच आजी माजी नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचा आज 22 वर्धापनदिन दिन आहे. पक्ष 23 व्या वर्षात पदार्पण करत आहे. वर्धापनदिनानिमित्त पक्षाकडून राज्यभर विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment