Vadgaon News : वडेश्वर ग्रामपंचायतीवर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा

एमपीसी न्यूज : वडगाव मावळ – वडेश्वर  ग्रामपंचायतीवर (महाविकास आघाडी) शिवसेना राष्ट्रवादीने झेंडा फडकवला आहे. सरपंचपदी छाया रवींद्र हेमाडे यांची तर उपसरपंचपदी ज्ञानेश्वर पारू जगताप यांची निवड झाली. 

सरपंचपदासाठी छाया रवींद्र हेमाडे व रूपाली गणपत सुपे यांनी अर्ज दाखल केले होते. सरपंचपदाच्या झालेल्या निवडणुकीत छाया हेमाडे 8 तर रूपाली सुपे यांना 3 मते पडली. तर ज्ञानेश्वर जगताप यांचा उपसरपंचपदासाठी एक अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली. निवडणूक निर्णय अधिकारी डी एम पवार, ग्रामसेवक डी ए पाटील यांनी कामकाज पाहिले.

शिवसेना तालुका प्रमुख राजेश खांडभोर यांच्या माध्यमातून शंकर हेमाडे व माजी चेअरमन छगन लष्करी माजी सरपंच बबन हेमाडे, तुकाराम लष्करी, अशोक खांडभोर यांच्या सहकार्यातून 11 पैकी 8 जागा जिंकून शिवसेना व राष्ट्रवादीने सत्ता स्थापन केली. मावळ मधील सर्वात मोठी आदिवासी ग्रामपंचायत म्हणून वडेश्वर ग्रामपंचायतीकडे पाहीले जाते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.