Pimpri : भारतीय जैन संघटनेतर्फे ध्वजारोहण

एमपीसी न्यूज – पिंपरी येथील भारतीय जैन संघटना विद्यालय येथे भारताचा 73 वा स्वातंत्र्य दिन भारतीय जैन संघटना पिंपरी-चिंचवड विभागतर्फे ध्वजारोहण करून उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे संदेश गादिया, (प्रमुख मार्गदर्शक ), विरेश छाजेड (अध्यक्ष भारतीय जैन संघटना, पिंपरी चिंचवड ), शुभम कटारिया, नयन शाह,उपस्थित होते. प्रभारी प्राचार्य कदम सर, उप प्राचार्य कोकणे सर, जाधव सर आणि शिक्षक वृंद यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले. या वेळी संदेश गादिया, विरेश छाजेड यांच्या हस्ते ध्वजरोहण करण्यात आले.

विद्यालयातील विद्यार्थ्यांनी समूह गीत, नृत्य आदी कला सादर केली. आजच्या दिवशी बी. जे. एस. चे संस्थापक आदरणीय शांतिलालजी मुथा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. त्यानिमित्त शाळेत 14ऑगस्ट रोजी रक्तदान शिबिर आयोजित केले होते. यावेळी शाळेचे प्रभारी प्राचार्य कदम सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना संघटनेतर्फे खाऊ वाटप करण्यात आले. आभार प्रदर्शन गर्जे सर यांनी केले. संघटनेतर्फे सह सचिव नयन शाह यांनी मनोगत व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.