pune : केरळमध्ये महापूर; पुण्यात ओणम साजरा न करण्याचा निर्णय

एमपीसी न्यूज – ओणम हा केरळचा मुख्य सण आहे. देशभरात काय पण जगभरात पसरलेले मूळचे केरळचे लोकं मोठ्या उत्साहाने आपापल्या शहरात ओणम सण साजरा करतात. पुण्यातही ओणम सण मोठ्या उत्साहाने साजरा होत असतो यंदा येत्या 25 ऑगस्टला ओणम आहे , मात्र यावर्षी केरळमध्ये आलेल्या जलप्रलयांनातर या पुण्यातील केरलवासीयांनी ओणम साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. तर यातून वाचणारे पैसे ते केरळला मदतस्वरूप पाठवणार आहेत. पुणे जिल्ह्यात मुळच्या केरळच्या असलेल्या लोकांची संख्या 4.5 लाख एवढी आहे. तसंच त्यांचा विविध भाग मिळून 30 संघटना आहेत.

धुंवाधार बरसणारा पाऊस आणि नद्यांना आलेला पूर यामुळे केरळमध्ये सध्या भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. जवळजवळ संपूर्ण केरळमध्ये पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. या पुरात 324 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 2 लाख नागरिक बेघर झाले आहेत. गेल्या 100 वर्षांतील सर्वात भीषण महापुराचा सामना करणाऱ्या केरळला देशभरातून मदतीचा हात पुढे केला जात आहे. महाराष्ट्रामधूनही केरळा मदत केली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.