Flood Report : महाराष्ट्रातील पूरस्थिती नियंत्रणात, NDRF च्या 25 आणि आर्मीच्या तीन टीम तैनात

एमपीसी न्यूज – मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे, सिंधुदूर्ग, कोल्हापूर, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडल्यामुळे निर्माण झालेली पूरपरिस्थती सध्या नियंत्रणात आहे. वाशिष्ठी नदी वरील चिपळूण व मुंबई यांना जोडणारा पूल कोसळल्यामूळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होऊन वाहतूक ठप्प झाली आहे.

सद्य स्थितीत राज्यात NDRF च्या 25 टीम व भारतीय सैन्य दलाच्या (आर्मी) तीन टीम बचाव कार्यासाठी कार्यरत आहेत. चिपळूण येथे पाच तात्पुरत्या निवारा केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या नियंत्रण कक्षाच्या वतीने आज (सोमवारी) सायंकाळी प्रसिद्ध केलेल्या पूरस्थिती अहवालात याबाबत माहिती देण्यात आली आहे.

गुरुवारपासून पश्चिम महाराष्ट्रात विक्रमी पावसाची नोंद झाली. 22 जुलैपासून राज्यात 192 लोकांनी आपला जीव गमावला आहे. यामध्ये मुंबई उपनगर 4, रायगड 95, रत्नागिरी 21, पुणे 2, ठाणे 12, सिंधुदूर्ग 2, कोल्हापूर 7, सातारा 45, अकोला 2 आणि वर्धा 2 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.