Flood Warning System: मुंबईसाठी पूर इशारा प्रणाली IFLOWS-MUMBAI आजपासून कार्यान्वित

Flood Warning System: Flood Warning System for Mumbai IFLOWS-MUMBAI operational from today मुंबईला विशेषत: अतिवृष्टीच्या घटना आणि चक्रीवादळासंबधी इशारा देण्याची तरतूद या प्रणालीद्वारे करण्यात आली आहे

एमपीसी न्यूज – पृथ्वी विज्ञान मंत्रालयामध्ये उपलब्ध असलेल्या देशांतर्गत कौशल्याचा वापर करून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निकट समन्वयाने विकसित करण्यात आलेली IFLOWS-MUMBAI ही एकात्मिक पूर इशारा प्रणाली आजपासून कार्यान्वित होत आहे. त्यामुळे मुंबईला विशेषत: अतिवृष्टीच्या घटना आणि चक्रीवादळासंबधी इशारा मिळू शकणार आहे. 

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि केंद्रीय आरोग्य व पृथ्वी विज्ञान मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या हस्ते आज (शुक्रवारी) दुपारी साडेबारा वाजता या  पूर इशारा प्रणालीची औपचारिक सुरुवात केली जाईल.

तापमानात वाढ आणि हवामान बदलांमुळे परिणामी मान्सूनमध्ये होणाऱ्या बदलांमुळे भारतामध्ये अतिवृष्टीचे प्रमाण वाढत आहे. महराष्ट्र राज्याची राजधानी आणि भारताची आर्थिक राजधानी असलेल्या या महानगराला अधूनमधून अनेकदा प्रदीर्घ कालावधीसाठी पुराचा अनुभव आला आहे आणि अगदी अलीकडेच 29 ऑगस्ट 2017 रोजी आलेल्या पुरामुळे हे शहर ठप्प झाले होते.

26 जुलै 2005 रोजी आलेल्या पुराच्या आठवणी अजूनही मुंबईकरांच्या मनात ताज्या असतील. जेव्हा 24 तासांच्या कलावधीत 100 वर्षांच्या कालवधीत सर्वाधिक 94 सेंटीमीटर पाऊस पडला होता आणि त्यामुळे संपूर्ण शहरच पूर्णपणे अधू झाले होते. पुराची पूर्वतयारी म्हणून लोकांना आधीच सतर्क केले जावे, जेणेकरून ते पूर येण्यापूर्वीच त्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज असतील.

पूरग्रस्त शहरात प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या मदतीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र सरकारने पृथ्वी विज्ञान मंत्रालयाला एकात्मिक पूर इशारा प्रणाली अर्थात IFLOWS-MUMBAI विकसित करण्याची विनंती केली होती. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निकट समन्वयाने पृथ्वी विज्ञान मंत्रालयामध्ये उपलब्ध असलेल्या देशांतर्गत कौशल्याचा  वापर करून जुलै 2019 मध्ये IFLOWS-MUMBAI च्या विकासास सुरुवात केली.

IFLOWS-MUMBAI ही मुंबई शहरासाठी एक अत्याधुनिक एकात्मिक पूर इशारा प्रणाली म्हणून विकसित केली आहे, ज्यामुळे मुंबईला विशेषत: अतिवृष्टीच्या घटना आणि चक्रीवादळा दरम्यान मुंबईला सुरवातीलाच इशारा देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

आय-फ्लोज मॉड्यूलर रचनेवर तयार केले गेले आहे आणि त्यात डेटा एकीकरण, पूर, जलप्रलय, असुरक्षा, जोखीम, प्रसार मॉड्यूल आणि निर्णय पाठिंबा प्रणाली अशी सात मॉड्यूल आहेत. या प्रणालीमध्ये नॅशनल सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर फोरकॉस्टिंग (एनसीएमआरडब्ल्यूएफ), भारतीय हवामान विभाग (आयएमडी), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रोपिकल मेटोरॉलॉजी (आयआयटीएम), यांनी तयार केलेल्या रेन गेज नेटवर्क स्टेशनवरील फील्ड डेटा, बृहन्मुंबई महानगरपालिका (एमसीजीएम) आणि आयएमडी, एमसीजीएम द्वारे प्रदान केलेल्या भू-वापरावरील पायाभूत सुविधा आदी  समाविष्ट केल्या आहेत.

हवामानाच्या मॉडेलच्या माहितीच्या आधारे, हायड्रोलॉजिकल मॉडेल्सचा वापर पर्जन्यवृष्टीच्या रूपरेषेत बदल करण्यासाठी आणि नदी प्रणालींना तो प्रवाह प्रदान करण्यासाठी केला जातो. हायड्रॉलिक मॉडेल्सचा उपयोग अभ्यासाच्या क्षेत्रात पुराचे मूल्यांकन करण्यासाठी पाण्याच्या हालचालीची प्रतिकृती तयार करण्यासाठी प्रवाहाच्या गतीची समीकरणे सोडविण्यासाठी केला जातो.

मुंबई समुद्राशी जोडलेले आणि सात बेटांनी मिळून तयार झालेले एक शहर असल्याने शहरावरील भरती आणि वादळाचे  परिणाम मोजण्यासाठी हायड्रोडायनामिक मॉडेल आणि वादळ वृद्धी मॉडेलचा उपयोग केला जातो. या प्रणालीमध्ये शहरातील गटारे शोधण्याची आणि पूरक्षेत्रांचा अंदाज बांधण्याची तरतूद या प्रणालीमध्ये आहे.

एमसीजीएम आणि आयएमडी, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने एनसीसीआरने मिठी, दहिसर, ओशिवरा, पोइसर, उल्हास, तलाव आणि खाडी या सर्व नद्यांमधून बैथीमीटरी माहिती एकत्र केली आहे.

भू स्थलाकृती, भू वापर, पायाभूत सुविधा, लोकसंख्या इत्यादी एमसीजीएमने पुरविलेल्या आणि जीआयएसमधील संकल्पनात्मक थरांचा वापर करून प्रभाग स्तरावरील पूर पातळीचा अचूक अंदाज लावण्यासाठी याला निर्णय समर्थन प्रणालीशी जोडले आहे. पुरामुळे होणाऱ्या घटकांच्या असुरक्षा आणि जोखमीची गणना करण्यासाठी वेब जीआयएस आधारित निर्णय समर्थन प्रणाली तयार केली आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.