Pune : पूरग्रस्तांची अतिरिक्त आयुक्तांच्या कार्यालयात धडक

एमपीसी न्यूज – आंबील ओढा, राजेंद्रनगर, दत्तवाडी भागातील नागरिकांनी आज नवीन घरे आणि आर्थिक मदत मिळण्यासाठी पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त शंतनू गोयल यांच्या कार्यालयात धडक दिली.

आम्ही पावसातच राहायचे का? परत पाऊस आला तर अवघड होणार, नागरिकांना तातडीने न्याय देण्याची मागणी भाजपचे नगरसेवक धीरज घाटे यांनी केली. धीरज घाटे आणि स्थानिक नागरिकांनी शंतनू गोयल यांच्या सोबत चर्चा केली. पुरात घर वाहून गेले आहे. आमचे पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली. 25 सप्टेंबरला अतिवृष्टी झाली होती. 15 हजार रुपये मदत देणार होते. 5 हजार रुपये सुद्धा मदत मिळाली नाही. काल सुद्धा मुसळधार पाऊस होऊन नागरिकांच्या घरांत पाणी घुसले. मागील वर्षी कालवा फुटीमुळे नागरिकांचे अतोनात नुकसान झाले होते. त्याची आर्थिक भरपाई अजूनही मिळाली नाही. त्यामुळे नागरिकांतर्फे संताप व्यक्त करण्यात येत आहे.

अतिरिक्त आयुक्तांच्या कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. नागरिक आपल्या लहान मुलांसोबत महापालिकेत आल्या आहेत. आमचे पुनर्वसन करा, अन्यथा आम्ही पावसातच राहायचे का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.