Ashadhi Wari 2022 : जगद्गुरू तुकाराम महाराज व ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीवर दगडूशेठ गणपती मंदिरासमोर पुष्पवृष्टी

एमपीसी न्यूज – माऊली…माऊली च्या जयघोषात पुण्यामध्ये लाखो वारक-यांसोबत आलेल्या जगद्गुरू तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी (Ashadhi Wari 2022) रथावर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासमोर पुष्पवृष्टी करण्यात आली. ज्ञानोबा…माऊली… तुकाराम च्या जयघोषासोबतच गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. यावेळी वारक-यांनी आरोग्यदायी, निर्मल आणि हरित महाराष्ट्रासाठी गणराया चरणी साकडे घातले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे जगद्गुरू तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा व विश्वस्तांचे स्वागत मोठया उत्साहात करण्यात आले. यावेळी दगडूशेठ गणपती ट्रस्टचे विश्वस्त, पदाधिकारी, मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Dehuroad Robbery Case : चोरीप्रकरणी चार जणांना अटक

वारीची शेकडो वर्षांची परंपरा (Ashadhi Wari 2022) असून दरवर्षी दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासमोर पालखीचे उत्साहात स्वागत केले जाते. यंदा ट्रस्टच्या 130 व्या वर्षानिमित्त वारीसोहळ्यातील राबविण्यात येणा-या उपक्रमांची सुरुवात झाली असून हरित वारी- वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, रुग्णवाहिका सेवा, आरोग्य तपासणी आणि वारक-यांकरीता नानाविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. वारक-यांनी देखील या उपक्रमांमध्ये सहभागी होत, सोयी-सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.