Maharashtra Police : हाताची घडी, तोंडावर मास्क; महाराष्ट्र पोलिसांकडून कोरोनाबाबत जनजागृती

Folds of hands, masks on face; Awareness about Corona from Maharashtra Police :

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र पोलिसांकडून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सोशल मीडियावरून विविध कलात्मक पोस्टद्वारे जनजागृती केली जात आहे. प्राथमिक शाळेत ‘हाताची घडी, तोंडावर बोट’ असा सल्ला, संदेश, दम वारंवार दिला जात असे. त्याचाच आधार घेऊन महाराष्ट्र पोलिसांनी कोरोनाबाबत जनजागृती करताना ‘हाताची घडी, तोंडावर मास्क’ अशी पोस्ट शेअर केली आहे. त्याचबरोबर नियमितपणे मास्क वापरण्याबाबत कोरोना काळातील व्याकरण देखील शेअर केले आहे.

पहिल्या पोस्टमध्ये हाताची घडी, तोंडावर मास्क असा संदेश असलेला फोटो शेअर केला आहे. त्या पोस्टमध्ये सांगण्यात आले आहे की – शिस्त म्हणजे शिस्त! आपण विद्यार्थी म्हणून जे नियम पाळत आलो आहोत, तेच नियम या काळात पाळणे अत्यंत गरजेचे आहे. घराबाहेर असताना मास्क वापरा व कुठल्याही वस्तूला विनाकारण हात लावू नका.

दुसऱ्या पोस्टमध्ये कोरोना काळातील सुरक्षेचे व्याकरण सांगण्यात आले आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी मास्क वापरणे हा अत्यंत योग्य उपाय आहे. सुखद भविष्यकाळासाठी हा व्याकरणाचा धडा आपण शिकलाच पाहिजे, असे म्हटले आहे.

 

तिसऱ्या पोस्टमध्ये डोळ्याच्या सुरक्षेसाठी डोळ्यावर चष्मा, उन्हापासून संरक्षण म्हणून डोक्यावर टोपी, कानाच्या सुंदरतेसाठी दागिने घातले जातात. चष्मा, टोपी, कानातील दागिने हे आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक होऊन बसले.

 

तसेच संपुर्ण शरीराच्या सुरक्षेसाठी नाक आणि तोंडावर मास्क घालणे ही सध्याची गरज आहे. टोपी, चष्म्या प्रमाणेच नाक आणि तोंडावर मास्क शोभत असल्याचे महाराष्ट्र पोलिसांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

चौथ्या पोस्टमध्ये महाराष्ट्र पोलीस जबाबदार नागरिकांना शोधत आहेत. पोलिसांनी ही शोधमोहीम त्यांच्या पद्धतीने आरंभली आहे. ‘आपण यांना पाहिलंत का?’ असे म्हणत पोलीस लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करणाऱ्या जबाबदार नागरिकांना शोधत असल्याचे पोस्टमध्ये म्हटले आहे.

 

पाचव्या पोस्टमध्ये महाराष्ट्र पोलिसांनी मास्कचे महत्व अंड्याचे उदाहरण देऊन पटवून दिले आहे.बाहेरून लावलेला मास्क विषाणूंना शरीराच्या आत जाण्यापासून रोखतो, असे या पोस्टमध्ये सांगण्यात आले आहे.

अनेक नेटिझन्स कोरोना काळातील घ्यावयाच्या सुरक्षेबाबत इंटरनेटवर शोध घेतात. महाराष्ट्र पोलिसांनी हाच धागा पकडून ‘सुरक्षा इंटरनेटवर शोधण्यापेक्षा आपल्या आजूबाजूला शोधा. कारण सुरक्षा आपल्यापासूनच सुरू होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.