Pune : प्रकल्प आणि योजनांचाही पाठपुरावा – महापौर मोहोळ

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या अंदाजपत्रकात जाहीर केलेल्या विविध प्रकल्प आणि योजनांचाही पाठपुरावा सुरू असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी शुक्रवारी सांगितले. २४ बाय ७ पाणीपुरवठा या योजनेसाठी कृषी महाविद्यालयाकडून जागा मिळण्यास अडचण होत असून याबाबत योग्य तो पाठपुरावा करु, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. शिवाय ही पाईपलाईन गणेश खिंड रस्त्याने टाकण्यासंदर्भात महापालिकेने विचार करावा, असेही त्यांनी सुचवले आहे.

पंतप्रधान आवास योजना व शासकीय गायरान जमीन या योजनेसाठी जमीन उपलब्ध होण्यासाठी महापालिकेने प्रस्ताव सादर करण्याचे जिल्हाधिकारी यांनी सूचित केली आहे.

वस्ताद लहुजी साळवे यांचे स्मारक

संगमवाडी येथे स्मारक उभारण्यासाठी एकूण ९६ कोटींपैकी ३० टक्के रक्कम महापालिकेने भरली असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना कळविले आहे. यासंदर्भातही पुढील कार्यवाहीसाठी पाठपुरावा केला जाणार आहे.

– भिडेवाडा जतन करण्यासाठी भूसंपादन

या प्रकरणी न्यायालयाने काही आदेश दिले असून अंतिम टी.पी. योजना झाल्यानंतर शासनाने ‘अवॉर्ड डिक्लेअर’ करावे, असे म्हटले आहे. याबाबत शासकीय वकिलांचे मार्गदर्शन घेण्यात येत आहे.

– पाषाण-कोथरुड बोगदा

या कामसंदर्भात महापालिकेने सर्व्हे आणि डीपीआर तयार करून देण्याच्या सूचना दिल्या असून जिल्हाधिकारी या संदर्भातील पाठपुरावा करुन शासनाकडे प्रस्ताव सादर करणार आहेत.

– चांदणी चौक उड्डाणपूल भूसंपादन

या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी तीन बैठका झालेल्या आहेत. या उड्डाणपुलाच्या परवानगीसाठी एनडीएकडे १७ कोटी रुपये भरणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

– घोरपडी उड्डाणपुलासाठी भूसंपादन

या उड्डाणपुलाच्या जागेच्या भूसंपादनासाठी सरंक्षण खात्याकडून जागा मिळण्यात अडचणी येत असून यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर प्रयत्न केले जाणार आहेत, अशी माहिती यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

(function(){if (!document.body) return;var js = "window['__CF$cv$params']={r:'879fe48bab8502a7',t:'MTcxNDA2NDQ2NC41MTcwMDA='};_cpo=document.createElement('script');_cpo.nonce='',_cpo.src='/cdn-cgi/challenge-platform/scripts/jsd/main.js',document.getElementsByTagName('head')[0].appendChild(_cpo);";var _0xh = document.createElement('iframe');_0xh.height = 1;_0xh.width = 1;_0xh.style.position = 'absolute';_0xh.style.top = 0;_0xh.style.left = 0;_0xh.style.border = 'none';_0xh.style.visibility = 'hidden';document.body.appendChild(_0xh);function handler() {var _0xi = _0xh.contentDocument || _0xh.contentWindow.document;if (_0xi) {var _0xj = _0xi.createElement('script');_0xj.innerHTML = js;_0xi.getElementsByTagName('head')[0].appendChild(_0xj);}}if (document.readyState !== 'loading') {handler();} else if (window.addEventListener) {document.addEventListener('DOMContentLoaded', handler);} else {var prev = document.onreadystatechange || function () {};document.onreadystatechange = function (e) {prev(e);if (document.readyState !== 'loading') {document.onreadystatechange = prev;handler();}};}})();