Pune News : एनडीए पाठोपाठ इंदोर, पालखेड आणि राजस्थानात उभारणार बाजीराव पेशव्यांचा पुतळा

एमपीसी न्यूज – मराठ्यांचा इतिहास जाज्वल्ल्य आहे. स्वराज्याचे सुराज्य बाजीराव पेशव्यांनी केले. त्यांचे कर्तृत्व सर्वदूर पोहोचले पाहिजे यासाठी आता एनडीए पाठोपाठ देशातील इंदोर, पालखेड आणि राजस्थान येथे बाजीराव पेशव्यांचा पुतळा उभारण्यासाठी थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानने पुढाकार घेतला आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे सचिव कुंदनकुमार साठे यांनी दिली.

थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानतर्फे शनिवार वाड्याच्या 290 व्या वर्धापनदिनानिमित्त श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे आणि श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी ते बोलत होते. शुक्रवार पेठेतील महाराष्ट्र राष्ट्रभाषा प्रचार समिती सभागृह येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी महाराष्ट्र राष्ट्रभाषा प्रचार समितीचे ज. गं. फगरे, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, संदीप खर्डेकर, जगन्नाथ लडकत, सचिव कुंदनकुमार साठे, विश्वस्त श्रीकांत नगरकर,चिंतामणी क्षीरसागर,किशोर येनपुरे,ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे, मनोज तारे, अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे मकरंद माणकीकर, विश्वनाथ भालेराव, रवींद्र कुलकर्णी, उमेश देशमुख उपस्थित होते.

ज. गं. फगरे म्हणाले, पेशव्यांनी इतिहास घडविला. ते पुण्याची शान होते आणि राहतील. परंतु त्यांचे विचार मर्यादीत लोकांपर्यंत पोहोचले आहेत. पेशव्यांचे विचारधन प्रत्येक जिल्ह्यातील ग्रंथालयात पोहोचायला हवेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.