Food and Drug : भेसळयुक्त चहा पावडर जप्त अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

एमपीसी न्यूज : शिवडी परिसरातील एका व्यापाऱ्याकडून भेसळयुक्त चहा पावडर (Food and Drug) व खाद्यरंग या अन्न पदार्थाचा 85 हजार 240 रुपयांचा साठा अन्न व औषध प्रशासनाने जप्त केल्याची माहिती विभागाने दिली आहे.

शिवडी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक हनमंत कुंभारे यांना दि 14 मे 2022 रोजी प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे मे. ए. आर. एम. ट्रेडर्स 38तळमजला, रामगड हटमेंट, शिवडी मुंबई 15 या ठिकाणची तपासणी केली. चहा पावडर या अन्नपदार्थास खाद्यरंग लावून विक्रीसाठी साठा केला असल्याचा आढळला. तसेच, खाद्यरंग आढळून आला.

हा साठा सकृतदर्शनी भेसळयुक्त असल्याच्या संशयावरून तेथून चहा पावडर व खाद्यरंग या अन्नपदार्थाचे अन्न नमुने घेऊन उर्वरित 429 किलोग्रॅमचा चहा पावडरचा साठा किंमत 85 हजार 240 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. हे अन्न नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत .

Pimpri News : शहरातील विविध विकासकामांसाठीच्या 12 कोटी खर्चाला प्रशासकांची मान्यता

संबंधित हजर व्यक्तीपेढीमालक (Food and Drug) यांच्या विरुद्ध शिवडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद देण्यात आलेली आहे. ही कारवाई म.ना.चौधरीसह आयुक्त (अन्न)अन्न व औषध प्रशासनबृहन्मुंबई व एस.एस.जाधवसहायक आयुक्त (अन्न)परिमंडळ ३ यांचे मार्गदर्शनाखाली ल.सो.सावळेअन्न सुरक्षा अधिकारीर.ज.जेकटेअन्न सुरक्षा अधिकारी यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.