BNR-HDR-TOP-Mobile

Pune : अन्न व औषध प्रशासनाचा छापा महादेव सेल्स व कॉर्पोरेशन गोडाऊनवर छापा

दर्जाहीन तेलाचे 25ते30 डबे जप्त

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – अन्न व औषध प्रशासनाने पुण्यातील मार्केटयार्ड येथील महादेव सेल्स आणि कॉर्पोरेशन या गोडाऊनवर आज बुधवारी (दि.19) छापा टाकला. गोडाऊनमधील दोन लाख रुपये किमतीचे खाद्य-तेलाचे 25 ते 30 डबे जप्त करण्यात आले. 

या गोडाऊनमध्ये दर्जाहीन खाद्यतेलाच्या डब्यावर किर्ती ऑईलचे स्टिकर चिटकवून ते बाहेर चढ्या किमतीने विकले जात होते. मागील अनेक दिवसांपासून हा गोरखधंदा सुरू होता. एफडीएच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळाल्यानंतर आज हा छापा टाकण्यात आला. यावेळी जवळपास दोन लाख रुपये किमतीचे खाद्यतेलाचे 25-30 डब्बे जप्त केले. एकप्रकारे हा ग्राहकांच्या आरोग्याशी खेळच सुरू असल्याचे यानिमित्ताने उघडकीस आले आहे. हे सर्व खाद्यतेलाचे डब्बे जप्त करण्यात आले आहेत.

HB_POST_END_FTR-A1
.