BNR-HDR-TOP-Mobile

Maval : पूरग्रस्त बांधवांना नागरिकांकडून अन्नधान्याची मदत

एमपीसी न्यूज – सांगली येथे झालेल्या महापुरातून पूरग्रस्त बांधवांचे झालेले मोठ्या प्रमाणात नुकसान पाहता त्यांना त्यांची कौटुंबिक परिस्थिती सांभाळता यांवी म्हणून वडगाव मावळ येथील नागरिकांनी त्यांना स्वेच्छेने तसेच उत्स्फूर्तपणे मदत देऊ केली. सांगलीच्या बहे गावातील 100 कुटूंबांना 20 ते 25 दिवस पुरेल अशा किराणा साहित्याचा एकत्रितपणे संच करून देण्यात आला.

प्रत्येक संचामध्ये तांदूळ, गहू, साखर, बाजरी, गव्हाचे पीठ, खाद्यतेल, चहा, मसाले, मीठ, टूथ पेस्ट, टूथ ब्रश, अंगाचे व कपड्याचे साबण, पोहे, माचीस, बिस्किटे, फरसाण, काही उपयोगी कपडे, सॅनिटरी पॅड, औषधे इत्यादी गोष्टींचा समावेश करण्यात आलेला आहे. ही सर्व मदत गरजू पूरग्रस्तांना थेट त्यांच्या घरी जाऊन वडगाव मावळ येथील काही ज्येष्ठ व युवक नागरिकांनी ही मदत सुपूर्द केली.

.