Akurdi : दळवीनगर येथे वारकऱ्यांना अन्नदान

एमपीसी न्यूज- संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या संत जिजाबाई महिला दिंडीत सहभागी वारकऱ्यांना दळवीनगर येथील पंढरीनाथ विनायक दळवी यांच्या वतीने अन्नदान करण्यात आले.

या वेळी देहू देवस्थानचे विश्वस्त ह.भ.प जालिंदर काळोखे महाराज, ब प्रभाग अध्यक्षा करूणाताई चिंचवडे, चिंचवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर शिंदे, प्रवचनकार सुप्रियाताई साठे-ठाकुर, दिंडीमालक विजया साठे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.