Hinjawadi: घरासमोरील कचरा उचलण्यास सांगितल्यावरून दोघांना बेदम मारहाण

for asking to pick up trash in front of the house two person beaten by neighbour in man parkhe wasti

एमपीसी न्यूज- जुन्या घराची साफसफाई करत असताना शेजाऱ्यांनी घरासमोर ठेवलेले सरपण आणि केरकचरा शेजाऱ्यांना उचलण्यास सांगितल्यावरून दोघांना चार जणांनी मिळून बेदम मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि.30) दुपारी माण, पारखेवस्ती येथे घडली.

सौरभ विजय सुतार (वय 20, रा. मुळखेड, ता. मुळशी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सचिन सुदाम सुतार, सुदाम बाळवंत सुतार, यमुना सुदाम सुतार, उषा सुदाम सुतार (सर्व रा. माण पारखेवस्ती, ता. मुळशी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सौरभ सुतार यांचे पारखे वस्ती येथे घर आहे. शनिवारी दुपारी त्यांच्या बंद घराची सौरभ आणि त्यांचे वडील साफसफाई करीत होते. आरोपींनी सौरभ यांच्या घरासमोर बराच केरकचरा आणि सरपण ठेवले होते. ते सरपण उचलण्यास आरोपी यांना सांगितले.

त्यावेळी आरोपींनी ‘आम्ही केरकचरा सरपण काढणार नाही, तुम्हाला काय करायचे ते करा’ असे म्हणून फिर्यादी यांना शिवीगाळ केली. आरोपींनी सौरभ यांना पकडून ठेवले आणि त्यांना लोखंडी रॉडने मारले.

तसेच आरोपी सचिन याने फिर्यादी यांच्या वडिलांच्या डोक्यात आणि कपाळावर कुर्‍हाडीने मारून गंभीर जखमी केले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.