Chakan Crime News : दोघांचे अपहरण करून रोख व ऑनलाईन घेतली दीड लाखांची खंडणी

एमपीसी न्यूज – चार अज्ञात लोकांनी दोघांचे अपहरण केले. त्यांना पकडीने हाताची बोटे कापण्याची धमकी देऊन दीड लाख रुपये खंडणी घेतली. हा प्रकार सोमवारी (दि. 18) दुपारी साडेबारा ते रात्री आठ वाजताच्या कालावधीत भांबोली फाटा वराळे सावरदरी येथे घडला.

मोहम्मद अहमद सगीर (वय 28, रा. वासोली फाटा, ता. खेड. मूळ रा. उत्तर प्रदेश) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार अज्ञात लोकांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 364 अ, 365, 384, 385, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी साडेबारा वाजता चार अज्ञात व्यक्ती एका कारमधून आले. आरोपींनी फिर्यादी सगीर आणि मुक्तार खान या दोघांना चाकूचा धाक दाखवून त्यांना कारमध्ये बसवून त्यांचे अपहरण केले. दोघांच्या हाताची बोटे पकडीने कापण्याची धमकी देऊन मारहाण करत दोघांकडून दीड लाख रुपये खंडणी घेतली. त्यातील काही रक्कम रोख तर काही रक्कम ऑनलाईन माध्यमातून घेतली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.