India Corona Update : सलग पाचव्या दिवशी तीन लाखांहून अधिक रुग्ण, 20.17 टक्के पॉझिटिव्हीटी रेट 

एमपीसी न्यूज – भारतात सलग पाचव्या दिवशी तीन लाखांहून अधिक कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत 3.06 लाख नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, 439 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशाचा पॉझिटिव्हीटी रेट 20.17 टक्के एवढा झाला आहे. 

1. गेल्या 24 तासांत देशभरात 3 लाख 06 हजार 064 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद  आहे.

2. देशात सध्या 22.49 लाख ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

3. भारताचा दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट 20.75 टक्क्यांवर पोहोचला आहे.

4. गेल्या 24 तासांत देशभरात 439 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

5. चोवीस तासांत 2 लाख 43 हजार 495 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशाचा रिकव्हरी रेट 93.07 टक्के एवढा आहे.

6. ICMR च्या आकडेवारीनुसार आजवर देशात 71.690 टक्के प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत. गेल्या 24 तासांत 14.74 लाख चाचण्या पार पडल्या.

7. देशात सलग पाचव्या दिवशी तीन लाखांहून अधिक कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. गुरुवार, शुक्रवारी, शनिवारी आणि रविवारी देखील तीन लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून आले होते.

8. महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, गुजरात, उत्तर प्रदेश, तमिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये नव्या रुग्णांची संख्या अधिक आहे.

9. कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रम अंतर्गत 162.26 कोटी नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.

10. देशाचा आठवड्याचा पॉझिटिव्हीटी रेट देखील वाढून 17.03 एवढा झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.