Tata: इतिहासात पहिल्यांदाच टाटा समूहातील सीईओंच्या वेतनात कपात

For the first time in history, the salaries of Tata Group CEOs have been slashed upto 20 percent Because of the corona virus impact

कोरोना विषाणूचा संपूर्ण जगाला मोठा फटका बसला आहे. अनेक मोठे उद्योगसमूह आर्थिक संकटात सापडले आहेत. लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. काही ठिकाणी वेतन कपातीचे वारे घोंगावण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, भारतातील टाटा समूहही इतिहासात पहिल्यांदाच टाटा सन्सचे अध्यक्ष तसेच सहायक कंपनीच्या सर्व सीईओंच्या वेतनात सुमारे २० टक्के कपात करणार आहे. कंपनीचा उद्देश हा कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करणे तसेच कंपनीची व्यवहार्यता निश्चित करण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येते.

‘इकॉनॉमिक टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, समूहातील सर्वांत महत्त्वाची आणि सर्वाधिक नफा कमावणारी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (टीसीएस) सर्वांत पहिल्यांदा सीईओ राजेश गोपीनाथन यांच्या वेतन कपातीची घोषणा केली. तर, इंडिया हॉटेल्सने यापूर्वीच त्यांचे वरिष्ठ अधिकारी या तिमाहीमध्ये आपल्या वेतनाचा एक हिस्सा कंपनीच्या झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी देणार असल्याचे जाहीर केले आहे.

टाटा स्टील, टाटा मोटर्स, टाटा पॉवर, ट्रेंट, टाटा इंटरनॅशनल, टाटा कॅपिटल तसेच व्होल्टासचे सीईओ तसेच एमडी हे पण कमी वेतन घेणार आहेत. कंपनीच्या एका अधिकाऱ्याने चालू आर्थिक वर्षात बोनसमध्येही कपात होणार असल्याचे म्हटले आहे.

टाटा समूहाच्या एका वरिष्ठ सीईओने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर सांगितले की, टाटा समूहाच्या इतिहासात अशी वेळ कधीच आली नाही. यावेळी व्यवसाय वाचवण्यासाठी काही कठीण निर्णय घेण्याची गरज आहे.

जोपर्यंत शक्य होईल, तोपर्यंत कर्मचाऱ्यांच्या हिताचे रक्षण व्हावे ही टाटा समूहाची संस्कृती आहे, असेही या अधिकाऱ्याने म्हटले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like