Pimpri: शाळा इमारतीसाठी खासदार रेखा यांच्याकडून सव्वा दोन कोटी रुपयांचा निधी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने कासारवाडी येथे बांधण्यात येणा-या शाळेच्या इमारतीसाठी अभिनेत्री व राज्यसभा खासदार रेखा यांनी खासदार निधीतून तीन कोटी रुपयांचा निधी दिला आहे. त्यापैकी दोन कोटी 25 लाख रुपयांचा पहिला हप्ता महापालिकेकडे वर्ग झाला आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक शाम लांडे यांनी पाठपुरावा केला.

_MPC_DIR_MPU_II

कासारवाडी येथील सर्व्हे क्रमांक 420 येथील छत्रपती शाहू महाराज विद्यामंदिराच्या आवारात पाच मजली शाळेच्या इमारतीचे काम सुरू आहे. यामध्ये 41 खोल्या असणार आहेत. प्रत्येक मजल्यावर मुली, मुलांसाठी स्वतंत्र स्वच्छातागृह, प्रयोगशाळा, ग्रंथालय देखील आहे. या शाळेच्या इमारतीसाठी 13 कोटी 71 लाख 32 हजार 197 रुपये खर्च आहे.

या शाळेच्या बांधकामासाठी खासदार निधीतून मदत करण्याची मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक शाम लांडे यांनी खासदार व अभिनेत्री रेखा यांच्याकडे केली होती. त्यानुसार त्यांनी खासदार निधीतून तीन कोटी रूपये देण्याचे मान्य केले आहे. त्याचा 2 कोटी 25 लाखांचा पहिला हप्ता 31 ऑक्टोबर रोजी महापालिकेकडे वर्ग केली आहे. उर्वरित 75 लाख रूपये शाळेचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर देण्यात येणार आहेत, अशी माहिती नगरसेवक लांडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.