India Corona Update : देशात सलग दुसऱ्या दिवशी एक लाखाहून कमी रुग्णांची नोंद 

एमपीसी न्यूज – भारतात सलग दुसऱ्या दिवशी एक लाखाहून कमी कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 92 हजार 496 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. काल मंगळवारी 86 हजार 498 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. कालच्या तुलनेत आज 6 हजार अधिक रुग्णांची वाढ झाली आहे. 

देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 कोटी 90 लाख 89 हजार 069 एवढी झाली आहे. त्यापैकी 2 कोटी 75 लाख 04 हजार 126 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. गेल्या 24 देशात तासांत 1 लाख 62 हजार 664 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. देशाचा रिकव्हरी रेट 94.55 टक्के एवढा झाला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

देशात सध्याच्या घडीला 12 लाख 31 हजार 415 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशातील कोरोना मृतांची संख्या 3 लाख 53 हजार 528 वर पोहोचली आहे. मागील 24 तासांत देशभरात 2 हजार 219 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. देशाचा मृत्यूदर 1.21 टक्के एवढा झाला आहे.

देशात आजवर 37 कोटी 01 लाख 93 हजार 563 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत तर, गेल्या 24 तासांत 19 लाख 85 हजार 967 नमूने तपासण्यात आले आहेत. आयसीएमआरने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

 

देशात कोरोना लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत देशात 23 कोटी 90 लाख 58 हजार 360 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे. त्यापैकी 19 कोटी 19 लाख 36 हजार 212 जणांना लसीचा पहिला डोस तर, 4 कोटी 69 लाख 04 हजार 423 जणांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.