India Corona Update : सलग दुसऱ्या दिवशी देशात साठ हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद 

एमपीसी न्यूज – देशात सलग दुसऱ्या दिवशी देशात साठ हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 62 हजार 714 नव्या कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली. तसेच, 312 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 19 लाख 71 हजार 624 एवढी झाली आहे. त्यापैकी 1 कोटी 13 लाख 23 हजार 762 जण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत 28 हजार 739 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.08 टक्के एवढं झाले आहे.

आयसीएआरने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आजवर 24 कोटी 09 लाख 50 हजार 842 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 11 लाख 81 हजार 289 चाचण्या शनिवारी (दि. 27) करण्यात आल्या आहेत.

देशात सध्या 4 लाख 86 हजार 310 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मागील 24 तासांत 312 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत 1 लाख 61 हजार 552 जण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.36 टक्के एवढा आहे‌. लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत देशात 6 कोटी 02 लाख 69 हजार 782 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.