CoronaVaccine Update : या कारणामुळे भारत बायोटेकच्या ‘कोवॅक्सिन’ लसीला अमेरिकेत परवानगी नाकारली

एमपीसी न्यूज : भारतीय कोरोना लस  कोवॅक्सिनला  अमेरिकेने  त्यांच्या देशात परवानगी नाकारली आहे.  अमेरिकेच्या फूड अँड ड्रग एडमिनिस्ट्रेशन अर्थात एफडीएने भारत बायोटेकच्या कोविड लसीच्या आपात्कालीन वापरासंदर्भातील अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे अमेरिकेत कोवॅक्सिनच्या लॉन्चिंगसाठी विलंब होणार आहे. भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन निर्मितीसाठीच्या अमेरिकेतील भागीदार ओक्युजेनने अमेरिकेतील एफडीएकडे पास मस्टर फाईल पाठवून कोवॅक्सिनच्या आपात्कालीन वापरासाठी परवानगी मागितली होती.

अमेरिकेने आपात्कालीन मंजुरी नाकारल्यानंतर ओक्युजेनच्या वतीने म्हटलं की, कोवॅक्सिनच्या वापरासाठी आता कंपनी संपूर्ण मंजुरीसाठी प्रयत्न करेल. अमेरिकेच्या एफडीएने कंपनीला लसीचे आणखी एकदा परिक्षण करण्याची सूचना केली आहे. जेणेकरून कंपनी बायोलॉजिकल परवान्यासाठी अर्ज करू शकले.

सध्या भारत बायोटेक कोव्हॅक्सिन लसीचे फेज-३ क्लिनिकल ट्रायल करत आहे. त्यांनी बुधवारी सांगितले की, याचा डाटा जुलैमध्ये जाहीर करू. ज्यानंतर कंपनी लसीच्या संपूर्ण परवान्यासाठी अर्ज करेल. पण सध्या कोव्हॅक्सिनला परदेशात मान्यता मिळविण्यात अडचणी येत आहेत, कारण जागतिक आरोग्य संघटनेला मंजूरीसाठी फेज-३चा डाटा पाहिजे.

एफडीएने भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनविषयी अधिक माहिती मागितली आहे. मात्र भारत ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI)ने आपल्या पहिल्या तीन टप्प्यांचा डेटा शेअर केला नाही. त्यामुळेच एफडीएने भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनच्या वापरास

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.