Technology News: या कारणामुळे Internet Explorer बंद करण्याची मायक्रोसॉफ्टची घोषणा

एमपीसी न्यूज : दिग्गज सॉफ्टवेअर कंपनी मायक्रोसॉफ्टने गेली 25 वर्षे अविरतपणे सेवा देणारे इंटरनेट एक्सप्लोरर आता बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. इंटरनेट एक्सप्लोरर पुढच्या वर्षी 15 जून 2022 या दिवशी बंद होणार असून मायक्रोसॉफ्ट एज् त्याची जागा घेणार असल्याची घोषणा कंपनीने केली आहे.

आता मायक्रोसॉफ्ट एज् विंडोज् 10 वरील इंटरनेट एक्सप्लोररची जागा घेणार असल्याची घोषणा मायक्रोसॉफ्ट एजचे प्रोग्रॅम मॅनेजर सीन लिंडरसे यांनी केली आहे. त्याचबरोबर इंटरनेट एक्सप्लोरर 11 डेस्कटॉप अॅप्लिकेशन हे 15 जून 2022 रोजी आता निवृत्त होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

कंपनीने दोन वर्षांपूर्वीच मायक्रोसॉफ्ट एज् इंटरनेट एक्सप्लोरर मोडची निर्मिती केली आहे. ते आता बऱ्यापैकी अनेक व्यवहारांची जागा घेत आहे. तसेच जुन्या वेबसाईटची जागा हे क्रोमिअम आधारित ब्राऊजर घेणार असून त्यासंबंधी अनेक व्यवहारही त्याने अॅडॉप्ट केले आहेत. इंटरनेट एक्सप्लोरर मोड ही जुन्या अॅक्टिव्ह एक्स कन्ट्रोल साईट असून त्याचा उपयोय अजूनही अनेक व्यवहारांसाठी होत आहे.

मायक्रोसॉफ्टने गेल्या वर्षी आपल्या मायक्रोसॉफ्ट टीमच्या वेब अॅपचा इंटरनेट एक्सप्लोरर सपोर्ट काढून घेतल्यानंतर या वर्षीच्या शेवटापर्यंत मायक्रोसॉफ्टच्या 365 सेवांचा इंटरनेट एक्सप्लोररचा सपोर्ट काढून घेण्यात येणार आहे. त्यामुळे आता मायक्रोसॉफ्टच्या ऑफिस 365, वनड्राईव्ह, आऊटलूक आणि इतर सेवांचा सपोर्ट 17 ऑगस्टनंतर बंद करण्यात येणार आहे. गेल्या पाच वर्षांपासून आपल्या ग्राहकांनी इंटरनेट एक्सप्लोररचा वापर बंद करावा यासाठी मायक्रोसॉफ्टकडू प्रयत्न केले जात आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.