गुरूवार, फेब्रुवारी 9, 2023

PCMC : शहर अस्वच्छ करणा-यांवरील दंडाच्या रकमेत दुपटीपेक्षा जादा वाढ, ‘इतकी’ असेल दंडाची रक्कम

एमपीसी न्यूज – सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, घाण करणे, कचरा जाळणे, उघड्यावर शौच करणे नागरिकांना आता चांगलेच महाग पडणार आहे. नागरिकांना अस्वच्छता करण्यापासून परावृत्त करण्यासाठी महापालिकेने दंडाच्या रकमेत दुपटीपेक्षा जादा वाढ केली आहे.(PCMC) सार्वजनिक ठिकाणी छोट्या प्रमाणात कचरा टाकणार्‍यांना 180 रूपयांऐवजी 500 रूपये दंड भरावा लागणार आहे. तसेच, ट्रक, टेम्पोद्वारे कचरा टाकणार्‍यांवर 180 रूपयाऐवजी थेट 50 हजार रूपये दंड आकारण्यात येणार आहे. तर, सार्वजनिक ठिकाणी थुंकणार्‍याला 150 रूपयांऐवजी आता 1 हजार रूपये दंड भरावा लागणार आहे.

राज्याच्या नगरविकास विभागाकडील 7 सप्टेंबर 2018 रोजीच्या घनकचरा व्यवस्थापन नियमानुसार, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेच्या नियमांचे पालन न करणार्‍या व्यक्ती अथवा संस्थांवर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार महापालिकांना प्रदान करण्यात आले आहेत. राज्याच्या नगरविकास विभागाने 16 ऑगस्ट 2019 रोजी महापालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती हद्दीमध्ये घनकचरा स्वच्छता व आरोग्य उपविधी लागू करण्याचा निर्णय घेतला. या उपविधीमध्ये कचरा फेकणे, उपद्रव निर्माण करणे, स्वच्छ अंगण उल्लंघन केल्याप्रकरणी दंड निर्धारीत करण्यात आले.

त्यानुसार महापालिकेमार्फत घरातील किंवा व्यावसायिक ठिकाणी विलगीकरण न केलेला व वेगळ्या डब्यांमध्ये साठवण न केलेला कचरा कचरा गोळा करणार्‍या गाडीकडे सोपविल्यास पहिल्या वेळी 300 रूपये आणि त्यानंतर प्रत्येक वेळी 500 रूपये दंड आकारण्यात येतो. (PCMC) रस्त्यावर घाण करणार्‍यांवर 180 रूपये, सार्वजनिक ठिकाणी थुंकणार्‍यांवर 150 रूपये, उघड्यावर लघुशंका करणार्‍यांवर 200 रूपये तर शौच करणार्‍यांवर 500 रूपये दंडात्मक कारवाई केली जाते. कोरोना प्रादूर्भाव कालावधीत सार्वजनिक ठिकाणी थुंकणार्‍यांवर एक हजार रूपये दंडाची आकारणी केली जात होती. तथापि, विविध स्वरूपाच्या कृत्यासाठी दंडाची व सेवा शुल्काची रक्कम शुल्लक आहे. त्याचबरोबर नागरिकांमध्ये स्वच्छतेची जोपासना होण्यासाठी आणि घाण केल्यास दंडाची रक्कम अधिक ठेवून त्यांना अस्वच्छतेपासून परावृत्त करण्याकरिता दंडाच्या रकमेमध्ये वाढ करण्याचा तसेच दंडाच्या रकमेचे पुननिर्धारण करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने 31 मे 2022 रोजी घेतला आहे.

Kalewadi News : काळेवाडी येथे अनधिकृत बांधकामावर कारवाई

सद्यस्थितीत सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणार्‍यांवर सरसकट 180 रूपये दंड आकारण्यात येतो. तथापि, अनेक भागांमध्ये ट्रक, टेम्पो अशा वाहनांमधून मोठ्या स्वरूपात कचरा टाकला जात असल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे छोट्या प्रमाणात कचरा टाकणे आणि मोठ्या प्रमाणात कचरा टाकणे या दोन्ही प्रकारासाठी दंडाची रक्कम वेगळी आकारण्यात येणार आहे. त्यानुसार, सार्वजनिक ठिकाणी छोट्या प्रमाणात कचरा टाकणार्‍यांना 180 रूपयांऐवजी 500 रूपये दंड भरावा लागणार आहे. तर, ट्रक, टेम्पोद्वारे कचरा टाकणार्‍यांवर 180 रूपयांऐवजी थेट 50 हजार रूपये दंड आकारण्यात येणार आहे. सार्वजनिक अथवा महापालिका मालमत्तांचे छोटे स्टीकर्स लावून विद्रुपीकरण केल्यास आता 500 रूपये दंड आकारण्यात येणार आहे. तर, मोठे स्टीकर्स अथवा पोस्टर लावून विद्रुपीकरण केल्यास आता पाच हजार रूपये दंड आकारण्यात येणार आहे. ऑनसाईट कंपोस्टींग (बल्क वेस्ट जनरेटर) करणार्‍यांवर पहिल्या प्रसंगी 5 हजार आणि पुढील प्रत्येक प्रसंगी 15 हजार रूपये दंडांत्मक कारवाई केली जाणार आहे.

घराच्या परिसरात डासोत्पत्ती स्थानांची निर्मिती करणार्‍यांना 1 हजार रूपये, व्यावसायिक आस्थापनांच्या परिसरासाठी 2 हजार रूपये तर इमारती, मॉल्स, थियटर्स, रूग्णालये यांना 10 हजार रूपये दंड आकारण्यात येणार आहे. त्याचबरोबर छोट्या स्वरूपात कचरा जाळण्याबद्दल 5 हजार रूपये आणि मोठ्या स्वरूपात कचरा जाळण्यात आल्यास 25 हजार रूपये दंड आकारण्यात येणार आहे. (PCMC) बंदी असणार्‍या प्लास्टीकचा वापर पहिल्यांदा करणार्‍यांना 5 हजार रूपये, दुसर्‍यांदा करणार्‍यांना 10 हजार रूपये तर तिसर्‍यांदा करणार्‍यांकडून 25 हजार रूपये दंड वसुल केला जाणार आहे.

मैला उपसा सुविधेसाठी 15 पटीने शुल्कात वाढ

महापालिकेमार्फत पुरविण्यात येणार्‍या मोबाईल टॉयलेटसाठी 100 रूपये सेवाशुल्क व 1 हजार रूपये अनामत म्हणून आकारले जात होते. त्यामध्ये आता 300 रूपये सेवाशुल्क व 3 हजार रूपये अशी वाढ करण्यात आली आहे. तर, मैला उपसा सुविधेसाठी निवासीकरिता 100 रूपये आणि व्यावसायिक आस्थापनांकडून 150 रूपये सेवाशुल्क आकारले जाते. त्यामध्ये आता 1500 रूपये आणि 2500 रूपये अशी वाढ करण्यात आली आहे.

कृतीचे स्वरूप सध्याचा दंड  सुधारीत दंड

#सार्वजनिक ठिकाणी थुंकणे   150   1000
# उघड्यावर लघुशंका करणे    200   500
# उघड्यावर शौच करणे 500 1000
# व्यावसायिक ठिकाणी कचरापेटी नसणे 180  500
# मोकळ्या भुखंडावर अस्वच्छता करणे 180  2000
#सार्वजनिक ठिकाणी राडारोडा टाकणे  3000
# जैववैद्यकीय कचरा सामान्य कचर्‍यात
अथवा सार्वजनिक ठिकाणी टाकणे 25000  35000

 

Latest news
Related news