Pune News : शिवणेत जबरी घरफोडी, 1 लाख 10 हजाराचा मुद्देमाल लंपास

एमपीसी न्यूज : उत्तमनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शिवणे गावात घरफोडीचा प्रकार उघडकीस आला आहे. अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून एक लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे.

याप्रकरणी राजू महादेव माने (वय 53, रा. माने बिल्डिंग, कामठे वस्ती, शिवणे) यांनी तक्रार दिली असून अज्ञात  चोरट्याविरोधात उत्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे घराला कुलूप लावून गावी गेले होते. यावेळी अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला आणि लोखंडी कपाटातील एक लाख दहा हजार रुपये किमतीचे 30 ग्रॅम सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली. उत्तम नगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.