Pune News : जबरदस्तीने लग्न करून संबंध ठेवले अन् अश्लील व्हिडीओ तयार केला, गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : जबरदस्तीने विवाहाचा आग्रह करुन शरीरसंबंध ठेवून त्याचे अश्लिल व्हिडिओ बनविले. त्यानंतर हे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणीकडून तब्बल 10 लाख रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune News) तसेच या तरुणीला घरी राहण्यासाठी जबरदस्ती देखील केली. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात सौरभ सुपेकर (रा. विश्वकर्मा पद्मजी पर्ल सोसायटी, भवानी पेठ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 22 वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे.
हा प्रकार मंगळवार पेठ, बावधन येथे डिसेबर 2023 पासून सुरु होता. दोघेही ऐकमेकांच्या ओळखीचे आहेत. सौरभने तरुणीला वेळोवेळी लग्न करण्याचा आग्रह केला. तिच्याबरोबर जबदस्तीने शरीरसंबध ठेवले. तिच्याशी ऑक्टोबर 2021 मध्ये जबरदस्तीने रजिस्टार विवाहही केला.
Shapith Gandharva : शापित गंधर्व – भाग 24 – कमनशीबी राजेंद्रकुमार कुमार गौरव
त्यानंतर तो त्यांच्या संबंधाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊ लागला. त्याने 10 लाख रुपये देखील तरुणीकडून उकळले. (Pune News) तिला आपल्या घरी राहण्यासाठी जबरदस्ती केली. नकार दिल्यानंतर तिच्या कुटंबियांना शिवीगाळ करुन तिचा वेळोवेळी पाठलाग केला.