BNR-HDR-TOP-Mobile

Pune : फोर्ड फिगोची काच फोडून 18 लाखांची रोकड चोरी

एमपीसी न्यूज – फोर्ड फिगो गाडीची काच फोडून गाडीत ठेवलेल्या 18 लाख रुपये अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना काल मंगळवारी (दि.21) सकाळी साडेदहा ते साडेअकराच्या दरम्यान कोंढवा येथील कुबेरा कॉलनी सोसायटीच्या गेट समोर एनआयबीएम रोड येथे घडली.

याप्रकरणी ओमप्रकाश चौधरी (वय 28, रा. उंड्री, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  चौधरी यांनी त्यांच्या पार्टनरसह मिळून बिल्डर पोरवाल यांच्याकडून चार गुंठे जमीन खरेदी केली होती. त्यातील 18 लाख रुपये हे पोरवाल यांना देणे होते. त्यासाठी वकिलांकडे जाऊन स्टॅम्प ड्यूडी भरावयाची होती. हे रुपये घेऊन चौधरी हे काल त्यांच्या फोर्ड फिगो गाडीतून रॉयल फर्निशिंग या दुकानात गेले. फिगो गाडी त्यांनी जवळच लॉक करून पार्क केली होती. गाडीत एका कॅटबरीच्या बॉक्समध्ये त्यांनी हे 18 लाख रुपये ठेवले होते. यावेळी कोणीतरी अज्ञात इसमाने गाडीची उजव्या बाजूची काच फोडून गाडीचे नुकसान करून गाडीतील 18 लाख रुपये चोरी करून नेले.

चौधरी यांच्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यांवर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोंढवा पोलीस पुढील तपास करीत आहे.

HB_POST_END_FTR-A2