Aundh : परदेशी साहित्यिकांची औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयास भेट

एमपीसी न्यूज – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्रामध्ये जागतिक भाषांचे प्रतिनिधित्व करणारे भाषाबन साकारणार आहे. त्यानिमित्त ‘पेन इंटरनॅशनल काँग्रेस’ या आंतरराष्ट्रीय स्तरावरील साहित्यविषयक परिषदेमध्ये सहभागी झालेल्या 180 देशांमधून आलेल्या साहित्यिकांपैकी 7 भाषेत लेखन करणाऱ्या साहित्यिकांनी औंध येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयास भेट दिली.

परदेशी साहित्यिकांचा महाविद्यालयाच्या भेटीचा उपक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. मंजुश्री बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली व मराठी विभागप्रमुख डॉ. संजय नगरकर यांच्या समन्वयाने झालेल्या या संवाद भेटीत मारिना गोर्झीका (रोमानिया), मोहम्मद शरीफ (सिएरा निऑन), निपुनी माओ (पीपल्स लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडिया), मोहम्मद मोहिद्दिन (बांगलादेश), डॉ. चिन्मोय हावलदर (बांगलादेश) या साहित्यिकांनी विद्यार्थी व प्राध्यापकांशी संवाद साधला. प्रारंभी मराठमोळ्या पद्धतीने परदेशी लेखक पाहुण्यांचे स्वागत विद्यार्थ्यांनी केले.

त्यानंतर पाहुण्यांच्या समोर महाराष्ट्राची लोकधारा हा विद्यार्थ्यांनी बसवलेला लोकगीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. प्रा. एकनाथ झावरे यांनी रयत शिक्षण संस्था व महाविद्यालयाच्या माहितीपटाचे सादरीकरण केले. त्यानंतर झालेल्या संवाद चर्चेत रोमानियाच्या  साहित्यिक निपोनि माओ  यांनी आपल्या साहित्यामधील प्रेरणा या आपल्या जीवनातील अनुभव असल्याचे सांगितले. तर सिएरा निपॉन  येथील साहित्यिक मोहम्मद शरीफ यांनी जगातील विविध भाषांमध्ये लिहिल्या जाणाऱ्या साहित्यामागे मानवतावाद महत्त्वाचा असल्याचे सांगितले. लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडियाचे सदस्य निपुनी माओ यांनी लोकभाषांमधून निर्माण होणारे साहित्य हे आपल्या संस्क्रुतीचा ठेवा असल्याचे प्रतिपादन केले. तर बांगलादेशातील साहित्यिक डॉ. चिन्मय  हावलदर, मोहम्मद मोहिद्दिन यांनी बांगलादेश व भारतातील सांस्कृतिक आणि भाषिक खुणा एकच असून, आपणास मराठी साहित्याविषयी  देखील आकर्षण असल्याचे सांगितले.

महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. मंजुश्री बोबडे म्हणाल्या की, पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेमध्ये आणि इंटरनॅशनल काँग्रेसमध्ये बऱ्याच प्रमाणात साम्य असून,  दोन्ही संस्था समता, बंधुता, न्याय यांचा पुरस्कार करणाऱ्या आहेत. त्यामुळेच आज पेन इंटरनॅशनल काँग्रेसचे सदस्य (लेखक) आमच्या महाविद्यालयाच्या भेटीस आल्यामुळे आम्हाला आनंद होत असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रसंगी झालेल्या चर्चेत महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. विलास सदाफळ, प्रा. एकनाथ झावरे, डॉ. संजय नगरकर, प्रा. पारकर मॅडम,  या प्राध्यापकांनी व रवींद्र जाधव, चंद्रकांत सोनवणे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख मराठी विभाग प्रमुख डॉ. संजय नगरकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. सविता पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रा. एकनाथ झावरे यांनी मानले.
या संवादानंतर परदेसी साहित्यिकांनी मराठी विभागास भेट देऊन विभागाअंतर्गत चालविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची व मराठी साहित्यातील साहित्यिकांची माहिती घेतली. यावेळी मराठी विभागातील सुदेश भालेराव,  कु.मोनाली भालवणकर, कु.नेहा काकडे, कु.प्रज्ञा शिंदे, डॉ.अतुल चौरे, प्रा.कुशल पाखले,  प्रा.किरण कुंभार, प्रा सुप्रिया पवार, प्रा. नलिणी पाचर्णे   यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी महाविद्यालयाचे वातावरण मराठमोळा  स्वरूपाचे झाले होते.
परदेशी पाहुण्यांच्या प्रस्थानाबरोबरच प्रा. भीमराव पाटील व डॉ. सुहास निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयातील दोनशे विद्यार्थ्यांनी जागतिक भाषा वारी, भाषा दिंडीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रवेशद्वारापासून ते बालगंधर्व रंगमंदिरापर्यंत सहभाग घेतला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.