Pune News : कोरोनाच्या पार्श्ववभूमीवर पथारी व हातगाडीवाल्यांना भाडे व दंड माफ करा

एमपीसी न्यूज : काेराेना नियंत्रणासाठी लागू केलेल्या निर्बंधामुळे शहरातील शहरी व गरीब नागरीकांचे छोटे मोठे व्यवसाय पूर्णतः ठप्प झाले आहेत. काेराेनामुळे गेले दीड वर्षापासून शहरातील हातगाडी, पथारीवाल्यांचे उत्पन्न कमी झाले आहे. त्यामुळे त्यांच्याकडून या कालावधीतील भाडे आणि दंड वसुल करू नये, अशी मागणी करणारा  प्रस्ताव माजी उपमहापौर डाॅ. सिद्धार्थ धेंडे यांनी स्थायी समितीला दिला आहे.

 शहरातील अधिकृत फेरीवाला, हातगाडीधारक, पथारीधारक, स्टॉलधारक हे देखील गेल्या दीड वर्षाच्या कालावधीमध्ये स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी कुटुंबाची मोडकळीस आलेली आर्थिक घडी बसविण्याचा प्रयत्न करीत आहेत. दीड वर्षात यांचेही व्यवसाय मोठ्या प्रमाणावर ठप्प झाल आहेत. महापालिकेतर्फे फेरीवाला धोरण नुसार या सर्व पथारीधारकांना सन २०२०-२०२१ च्या आर्थिक वर्षातील भाडे आकारणीची बिले पाठविण्यात आली आहेत. प्रतिदिन ५० रूपये प्रमाणे ३६५ दिवसाचे १८२५०  आणि दंड म्हणीन २२५० रुपये आकारले आहेत. हा एक प्रकारे शहरातील जवळजवळ ८०००० पथारी व्यावसायिकांना अन्यायकारक आहे. 

 मागील आर्थिक वर्षामध्ये कोरोना काळात पथारीचे व्यवसाय पूर्णतः बंद असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. आजही कोरोनाच्या नियमावलीमध्ये हे व्यवसाय पूर्ण क्षमतेने चालू नाहीत. त्यामुळे सर्व पथारीधारकांना सन २०२० – २०२१ या आर्थिक वर्षाच्या भाडे आकारणीत व्यवसाय भाडे व दंड पूर्णतः माफ करावा, असे डाॅ. धेंडे यांनी प्रस्तावात नमूद केले आहे. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.