Form 17 : दहावी आणि बारावीची बाह्य परीक्षा देणाऱ्यांसाठी फॉर्म नंबर 17 उपलब्ध

एमपीसी न्यूज – बाह्य पद्धतीने दहावी आणि बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फॉर्म नंबर 17 उपलब्ध करून देण्यात आला आहे. यासाठी 2 ते 28 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन नावनोंदणी करता येणार आहे.

खासगीरित्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी नावनोंदणी ऑनलाइन पद्धतीनेच भरायचे आहेत. त्यामुळे कोणाचाही ऑफलाइन अर्ज स्वीकारला जाणार नाही, याची नोंद घ्यावी, असे राज्य मंडळाने सांगतिले आहे.

ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळ :

दहावी – http://form17.mh-ssc.ac.in

बारावी – http://form17.mh-hsc.ac.in

विद्यार्थ्यांचा मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी पुढील संपर्कासाठी अनिवार्य आहे. अर्ज भरल्यावर त्याची प्रत विद्यार्थ्यांनी अर्जात दिलेल्या ई-मेलवर पाठविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना नावनोंदणी प्रमाणपत्र ऑनलाइन देण्यात येणार असून, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी परीक्षेची आवेदनपत्रे राज्य मंडळाने दिलेल्या कालावधीत परीक्षा शुल्कासह भरणे आवश्यक आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.