Pune News : शिरुरचे भाजपचे माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचे निधन

एमपीसी न्यूज – शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचे दीर्घ आजाराने आज (गुरुवारी) निधन झाले. ते 71 वर्षांचे होते.

शिरूर तालुक्यातील भाजपचा मोठा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते.बाबुराव पाचर्णे यांनी 2004 ते 2009 आणि 2014 ते 2019 या कालावधीत शिरूर विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले होते.2014 विधानसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीचे नेते अशोक पवार यांना हरवून विजय मिळवला होता.त्यानंतर 2019 च्या निवडणुकीत पाचर्णे यांचा अशोक पवार यांच्याकडून पराभव झाला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी बाबुराव पाचर्णे यांची शिरुर येथे रुग्णालयात जाऊन भेट घेतली होती.गेल्या दोन वर्षांपासून ते गंभीर आजाराने ग्रस्त होते.मात्र काही दिवसांपासून त्यांचा आजार बळावला आणि प्रकृती ढासळली.त्यातच आज दुपारच्या सुमारास बाबुराव पाचर्णे यांची शिरूर येथे प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने मतदारसंघात भाजपचा मोठा धक्का बसला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.