Pune News : माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांचे ‘ते’ विधान अत्यंत धक्कादायक : शरद पवार 

एमपीसी न्यूज : देशाची न्यायव्यवस्था जीर्ण झाली असून मला विचारालं तर मी कुठल्याही गोष्टीसाठी न्यायालयात जाणार नाही. तिथे तुम्हाला न्याय मिळत नाही, असे धक्कादायक विधान माजी सरन्यायाधीश आणि राज्यसभेचे खासदार रंजन गोगोई यांनी काल (शनिवारी दि.13) केले. 

_MPC_DIR_MPU_II

खुद्द माजी सरन्यायाधीश यांच्या या वादग्रस्त  विधानाने वादाला तोंड फुटले आहे. पुण्यात एका कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे पुण्यात आले होते.

त्यावेळी राज्यसभेचे खासदार रंजन गोगोई यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाबद्दल शरद पवार यांना विचारले असता पवार म्हणाले, राज्यसभा खासदार आणि माजी सरन्यायाधीश यांनी जे काल विधान केले आहे. ते अंत्यत धक्कादायक आहे. त्यांचे विधान हे न्याय व्यवस्थेतील सत्य सांगण्याचा प्रयत्न तर केला नाही ना, हे मला ठाऊक नाही. तसेच त्यांनी केलेल विधान प्रत्येकाला चिंता निर्माण करणारे ठरणार आहे. या बद्दल माझ्या मनात शंका नसल्याची भूमिका त्यांनी यावेळी मांडली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.