Delhi : दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन

एमपीसी न्यूज – काँग्रेस नेत्या आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे दीर्घ आजाने निधन झाले. त्या 81 वर्षांच्या होत्या. काही वेळातच त्यांचे पार्थीव त्यांच्या निजामुद्दीन येथील राहत्या घरी आणण्यात येणार आहे. 

शीला दीक्षित या ब-याच काळापासून आजारी होत्या. त्यांच्यावर एस्कॉर्ट रुग्णालयात उपचार सुरू होते. त्या  1998 पासून 2013 पर्यंत सलग 15 वर्ष दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने सलग तीन वेळा सरकार स्थापन केले.

शीला दीक्षित यांचा जन्म 31 मार्च 1938 रोजी पंजाबच्या कपूरथला मध्ये झाला. त्यांनी दिल्ली येथी कॉन्वेंट ऑफ जीसस एंड मैरी या शाळेतून शिक्षण घेतले. तर दिल्ली विद्यापीठातील मिरांडा हाऊस कॉलेजमधून एम ए केले. त्या 1984 ते 1989 पर्यंत उत्तर प्रदेशमधील कन्नोज येथून सांसद होत्या.

शीला दीक्षित यांनी महिलांच्या परिस्थितीवर संयुक्त राष्ट्र आयोगात 1984 ते 1989 या 5 वर्षांच्या काळात भारताचे प्रतिनिधीत्व केले. त्या केरळच्या राज्यपाल पदावरही कार्यरत होत्या. त्यांच्या कार्यकाळात दिल्लीचा मोठा विकास झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.