Pimpari Chichwad : थिसेन क्रुपचे माजी कामगारनेते अनिल लावंड सेवानिवृत्त

एमपीसी न्यूज : पिंपरीच्या थिसेन क्रुप इंडिया लिमिटेडमधील माजी कामगारनेते अनिल लावंड 43 वर्षेच्या सेवेनंतर निवृत्त झाले. बुधवार दिनांक 9 रोजी कंपनी आवारात त्यांचा निरोप समारंभ पार पडला.

_MPC_DIR_MPU_II

कंपनीचे एच-आर डायरेक्टर छाबरीया व जनरल मॅनेजर मनोज राणे यांच्या हस्ते लावंड यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात युनियनचे अध्यक्ष राम वाईणगडे यांनी सूत्रसंचलन केले तर गोडसे यांनी आभार मानले. यावेळी नेमाडे,  अशोक भापकर,  मनोज आनचन,  भोसले व  इतर कर्मचारी उपस्थित होते.

लावंड  हे  1977 पासून कंपनीमध्ये कार्यरत होते. त्यांनी अनेक वर्षे युनियन मध्ये काम केले व कामगारांसाठी अनेक योजना राबवल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.