Talegaon Dabhade : साहित्य, कला आणि संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी ॲड.रंजना भोसले

एमपीसी न्यूज : तळेगाव दाभाडे येथील साहित्य, कला आणि संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी माजी नगराध्यक्षा ॲड.रंजना रघुनाथ भोसले तर कार्याध्यक्षपदी विद्यार्थी प्रिय शिक्षिका स्नेहल दत्तात्रय बाळसराफ यांच्यासह 9 पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे .

या मंडळाच्या उपाध्यक्ष पदावर साहित्यिक डॉ.अपर्णा देविदास रायरीकर (पुणे) यांची तर कार्यवाह म्हणून आरती पेंडभाजे सहकार्यवाह निशा पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली सदस्य म्हणून ज्योती शिंदे, अपर्णा दाणी (संगमनेर),सविता ठाकुर, रूपाली जव्हेरी यांची बिनविरोध निवड झाली असून प्रथमच संस्थेच्या कार्यकारिणीवर सर्व महिलांना बिनविरोध संधी दिली आहे.

मंडळाचे संस्थापक अध्यक्ष ॲड सहदेव मखामले, सचिव अर्जुन गायकवाड, कोषाध्यक्ष शैलेश मखामले, कार्यकारी सदस्य देवेंद्र बारमुख आदींनी या निवडीची घोषणा केली. तर सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा व सदस्यांचा सन्मान करून पदग्रहण समारंभ संपन्न झाला.

सुमारे चाळीस वर्षांपूर्वी या संस्थेची स्थापना झाली असून राज्यस्तरीय कथा कविता स्पर्धा, काव्य सादरीकरण स्पर्धा,मराठी भाषा धोरण विषयक कार्यशाळा, आदी उपक्रम या संस्थेच्या माध्यमातून राबवले जातात. निवडीनंतर सर्व महिला पदाधिकाऱ्यांचे व सदस्यांचे अभिनंदन करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.