Pune : अयोध्येतील राम जन्मभूमी न्यासच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी माजी मंत्री दिलीप कांबळे यांची नियुक्ती

एमपीसी न्यूज – अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी न्यासच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडीचे पत्र त्यांना श्री राजजन्मभूमी मंदिर निर्माण न्यास (अयोध्या, उत्तर प्रदेश)चे अध्यक्ष महंत जनमेजय शरण यांनी दिले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच अयोध्येतील वादग्रस्त जागेसंदर्भात निकाल दिला आहे. या निकालामुळे अयोध्येत राम मंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रभू रामचंद्र हे प्रत्येक व्यक्तीसाठी आदर्श आहे. उत्तम राजा, पूत्र आणि पती हे प्रभू रामचंद्र होते, असे निवडीनंतर दिलीप कांबळे यांनी सांगितले. श्रीराम जन्मभूमी मंदिर न्यासतर्फे अयोध्येत भव्य राम मंदिर उभारण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like