Pimpri News : व्हायरल पत्राबाबत माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांनी घेतली गृहमंत्र्यांनी भेट

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडचे तत्कालीन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्यासाठी 200 कोटींची वसुली झाल्याचे एक पत्र नुकतेच व्हायरल झाले. या पत्राची गृहमंत्र्यांनी दखल घेतली असून सचिवांमार्फत याची चौकशी केली जात असल्याचे पिंपरीचे माजी आमदार गौतम चाबुकस्वार म्हणाले.

माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांची बुधवारी (दि. 11) भेट घेऊन याप्रकरणी सीआयडी चौकशीची मागणी केली. गृहमंत्र्यांनी सचिवांची नियुक्ती करून याची चौकशी करण्याचे आदेश दिले असल्याचे माजी आमदार चाबुकस्वार यांनी सांगितले.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय स्तरावर देखील या पत्राची चौकशी केली जात आहे. हे पत्र जाणीवपूर्वक व्हायरल करण्यात आले असून बदनामी करणे हा यामागील उद्देश असल्याचे अनेकजण सांगत आहेत.

दरम्यान व्हायरल पत्रातील अर्जदार असलेले सहाय्यक निरीक्षक आणि तत्कालीन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी देखील हे पत्र बनावट असल्याचा खुलासा केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.